आझम कॅम्पसच्या शैक्षणिक संस्थांकडून वारकऱ्यांची तीन दिवस सेवा

पुणे : डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठ, पुणे आणि महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी मधील शैक्षणिक संस्थांच्या वतीने वारकऱ्यांच्या सेवेसाठी दि.२१ जून ते २३ जून दरम्यान तीन दिवस विविध उपक्रमांचे आयोजन वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आले.एम ए रंगूनवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी च्या वतीने कसबा गणपती जवळ वारकऱ्यासांठी शिबीर घेण्यात आले .
एम.ए.रंगूनवाला इंस्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट च्या वतीने वारकऱ्यांना फूड पॅकेट चे वाटप करण्यात आले.एम ए रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस च्या वतीने घोरपडे पेठ आणि कस्तुरे चौकात दंत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले .ए.के.के.लॉ अकॅडमी च्या वतीने वारकरी भक्तियोग उपक्रम आयोजित करण्यात आला.
डॉ.पी.ए.इनामदार विद्यापीठ,पुणे आणि महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी यांच्या वतीने ‘राष्ट्रीय सेवा योजना’ अंतर्गत वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.२१ जून रोजी स्कायलाईन बिल्डिंग, नाना पेठ येथे “वस्तू वाटप कार्यक्रम” आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात वारकऱ्यांच्या प्रवासात उपयोगी पडणाऱ्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन अल्लाना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसच्या वतीने करण्यात आले होते.सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या उपक्रमात शेकडो वारकऱ्यांनी सहभाग घेतला.या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासत तरुण विद्यार्थ्यांनी सेवाभावी वृत्तीचे दर्शन घडवले. या सेवाकार्यात विद्यापीठाचे अधिकारी, शिक्षकवृंद, आणि स्वयंसेवक यांनी सक्रिय सहभाग घेतला.डॉ. पी.ए. इनामदार यांच्या प्रेरणेने दरवर्षीप्रमाणे यंदाही आझम कॅम्पसच्या विविध संस्थांनी वारीतील सेवाभाव परंपरेत आपली भुमिका बजावत समाजातील ऐक्य व समर्पण याचा आदर्श घालून दिला.२२ जून २०२५ रोजी ‘स्कूल ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स, डिझाईन अँड आर्ट’ विभागातर्फे खिचडी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .२३ जून २०२५ रोजी, अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी आणि माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वारकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या वस्तूंचा वस्तू वाटप कार्यक्रम’ सासवड येथे झाले.
या सर्व उपक्रमात महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तसेच डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ.पी.ए.इनामदार,उपाध्यक्ष आबेदा इनामदार,सचिव प्रा.इरफान शेख,सर्व संस्थांचे विश्वस्त ,प्राचार्य ,संचालक ,प्राध्यापक ,कर्मचारी , विदयार्थी सहभागी झाले.
–
~

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636