इचलकरंजी शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद , शालेय विद्यार्थिनी जखमी रुग्णालयात दाखल
पुणे न्यूज एक्सप्रेस
इचलकरंजी : मराठे मिल कार्नर परिसरात आज पहाटे पावने सहाच्या दरम्यान शालेय विद्यार्थीनी क्लासला जात असताना भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने अचानक विद्यार्थिनीच्या मागे पकडण्यासाठी मागे धावले मुळे विद्यार्थिनीचा सायकलीवरचा ताबा सुटून रस्त्या शेजारच्या कॉम्प्लेक्स प्लेसमेंट मध्ये सुमारे दहा-पंधरा फूट खाली पडल्या मुळे जखमी झाली आहे .
सकाळी फिरायला सकाळ च्या क्लासेस ला शालेय विद्यार्थी जाणारे नागरिक, घराबाहेर, सोसायटीत खेळणारी मुलं, पहाटे,रात्री उशिरा दुचाकीवर प्रवास करणाऱ्या नागरिकांवर या भटक्या कुत्र्यांकडून पाठीमागे लागणे हल्ले करणे प्रमाण वाढले आहेत
शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, त्यांची संख्या हजारावर आहे. मात्र, महापालिका दरवर्षी केवळ काही कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करू शकते. कुत्र्यांच्या वाढीच्या वेगाच्या तुलनेत हे प्रमाण फारच तोकडे असल्याने त्यांच्या संख्येवर नियंत्रण आणण्यात महापालिका पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील कित्येक ठिकाणी भटक्या श्वानाने अचानक हल्ला केल्याने नागरिक गंभीर जखमी झाले होते. कुत्र्याने चावा घेतल्याने जखमी झाले होते.
कु नंदिनी विजय वाईंगडे श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल इयत्ता”10 वी डॉ चव्हाण, नुतन बँक जवळ AXON HOSPITAL मध्ये अतिदक्षता विभागात ऍडमिट आहे

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636