बालाजी विद्यालय, इचलकरंजी येथे कार्यशाळा संपन्न.
तरुणाईसाठी नवी दिशा : मिशन झिरो ड्रग्ज’ अभियानास सुरुवात
गजानन शिरगावे :
इचलकरंजी : समाजामध्ये वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेला आळा घालण्यासाठी आणि तरुणाईला नशामुक्त जीवनाकडे वळवण्यासाठी शासन व विविध स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन झिरो ड्रग्ज’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृतीसाठी व्याख्यान आयोजित केले जात आहे. विद्यार्थ्यांना व्यसनाच्या दुष्परिणामांबाबत माहिती देऊन त्यांना आरोग्यदायी जीवनशैलीकडे वळवण्यावर भर दिला जाणार आहे.*
*तसेच पोलिस विभाग,आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्या संयुक्त सहकार्याने ड्रग्जविरोधी मोहिमा राबवून अवैध धंद्यांवर कारवाई केली जाणार आहे.समाजातील पालक, शिक्षक आणि युवक संघटनांनाही या अभियानात सक्रिय सहभागासाठी आवाहन गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांनी केले.
‘मिशन झिरो ड्रग्ज’मुळे तरुणाईला नशेच्या विळख्यातून मुक्त करून त्यांना समाजासाठी सक्षम, जबाबदार आणि निरोगी नागरिक घडविण्यास निश्चितच हातभार लागेल,असा विश्वास जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती वैशालीताई नाईकवडे यांनी व्यक्त केला.
यावेळी वेतन विभागाचे अधिकारी फाटक साहेब,प्रशालेच्या मुख्याध्यापिका मंजुषा रावळ मॅडम,उपमुख्याध्यापक नारायणकर सर,सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगांवे, सुरज केसेकर,निर्मला शिरगांवे, रमेश नायकवडे सर शिक्षक, शिक्षिका व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.* *यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर शिंदे सरांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार एन डी चौगुले यांनी मानले.

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636