पाच दिवशीय बौद्ध धम्म अभ्यास ध्यान शिबिराची सांगता
पुणे न्यूज एक्सप्रेस :
हेरले प्रतिनिधी /संदीप कोले
हातकणंगले तालुक्यातील पेठ वडगाव येथील बहुजन हिताय बहुजन सुखाय वस्तीग्रह येथे त्रिरत्न बौद्ध महासंघ ,कोल्हापूर आयोजित पाच दिवसीय बौद्ध धम्म अभ्यास ध्यान शिबिर 11 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आले होते.
या शिबिराचे नेतृत्व आदरणीय धम्मचारी नित्यबोधि ठाणे यांनी केले प्रमुख उपस्थिती आदरणीय धम्मचारी वरोदय आदरणीय धम्मचारी ऋतुजित आदरणीय धम्मचारी आर्यकुमार धम्मचारी शाकयबोधी यांची होती या शिबिरामध्ये चार संग्रही वस्तू अर्थात धर्मांतराची मूळ तत्वे या विषयावरती अभ्यास घेण्यात आला सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत शारीरिक व्यायाम योगा ध्यान साधना गटचर्चा संपर्क सराव व्यक्तिगत संपर्क प्रवचन पाली पूजा इत्यादी दैनंदिनी ठरविण्यात आली होती
या शिबिरा करता वेगवेगळ्या जाती-धर्मातील वेगवेगळ्या गावावरून 33 लोकांनी सहभाग घेतला होता. सांस्कृतिक कार्यक्रम शिबिरातील अनुभव शिबिरार्थींची मनोगते सप्तांग पूजा अशा विविध गोष्टी शिबिरामध्ये शिकविण्यात आल्या सुख शांती आणि आनंद जीवनात निर्माण करण्यासाठी जागृती निर्माण करण्यासाठी आपल्या मनाला प्रशिक्षित करण्यासाठी श्रद्धेचा विकास करण्यासाठी तथागत गौतम बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्वच महापुरुषांचा विचार जीवनात कसा रुजवावा याचे प्रशिक्षण देण्यात आलं शेवटी हेरले गावचे सुपुत्र बी.एस.एफ मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या शिबिराचे आभार,प्रदर्शन धम्ममित्र निलेश कटकोळे यांनी केले.
या शिबिरा करता अनेक दानशूर व्यक्तींनी दान देऊन शिबिरास मदत केली. शेवटी मैत्री गीताने सांगता करण्यात आली.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636