क्रिकेट विश्वचषक विजया बाबत भाकीत खरे ठरले
ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांचा दावा
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : टी-२० क्रिकेट विश्वचषक भारतच जिंकेल असे केलेले भाकित खरे ठरल्याचा दावा ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी आज पुण्यात पत्रकाद्वारे केला आहे.टी-२० विश्वचषक सामन्याबाबत उपांत्य सामन्यात भारत जिंकेल आणि अंतिम सामन्यात भारत जिंकून विश्वचषक मिळवेल असे भाकीत सोशल मीडियावर त्यांनी केले होते.ही दोन्ही भाकिते खरी ठरली आहेत,असे मारटकर यांनी सांगितले.
यापूर्वी त्यांनी राजकीय घडामोडी,नैसर्गिक संकट,शेअर मार्केट,लोकसभा,विधानसभा निवडणुकींची वर्तविलेली अनेक भाकिते अचूक ठरली आहेत.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एनडीए चे सरकार स्थापन होऊन नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील व एनडीएचे सरकार ५ वर्षाचा कालावधी पूर्ण करतील,असे भाकीत वर्तविले होते तसेच पुणे व बारामती लोकसभा मतदार संघातून अनुक्रमे मुरलीधर मोहोळ व सुप्रिया सुळे विजयी होतील असे भाकित वर्तविले होते,ते अचूक ठरले,असे मारटकर यांनी पत्रकात म्हटले आहे.
‘ज्योतिष ज्ञान’ हे ज्योतिषाला वाहिलेले मासिक आहे.सिद्धेश्वर मारटकर हे या मासिकाचे संपादक तसेच ज्योतिष अभ्यासक आहेत.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636